अभ्यासक्रम
- शाळा महाराष्ट्र शासन मान्य खाजगी अनुदानित संपूर्ण मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे.
- शाळेची स्थापना ४ जानेवारी १८९९ रोजी झाली.
- शाळेचा UDISE - २७२५१८०१०१५
- इ.१ ली ते ४ थी पर्यंत मुलगे व मुली एकत्रित (सह शिक्षण - co education )
- महाराष्ट्र शासनाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. मातृभाषेतून शिक्षण या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संपूर्ण शिक्षण मराठी या मातृभाषेतून शिकण्याची संधी शाळेत उपलब्ध आहे.
- मराठी, इंग्रजी, गणित,परिसर अभ्यास या अभ्यास विषयांसह कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. मातीकाम,बागकाम, भातलावणी यासारख्या कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी घेतात.
शाळेची वेळ व गणवेश
- सोमवार ते शुक्रवार : स. १०.५५ ते दु. ४.३० ( नियमित निळा गणवेश )
- शनिवार : स. ९.०० ते दु. १२.०० ( खेळाचा पी.टी. गणवेश )
- गणवेश संपर्क - सुपेकर टेलर्स, मंगळवार पेठ, पुणे ११
विशेष अभ्यासक्रम व बाह्य परीक्षा
- तज्ञ मार्गदर्शकांमार्फत स्पोकन इंग्लिश, मौखिक संस्कृत, संगणक, चित्रकला, गायन, लंगडी व खो-खो खेळाचे मोफत प्रशिक्षण, तायक्वांदो-कराटे, भरतनाट्यम व कथ्थक नाममात्र शुल्कासह प्रशिक्षण.
- डी.ई.एस. पूर्व शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ थी
- टि.म.वी. गणित प्रवेश परीक्षा इ.४ थी
- गणित प्रारंभिक परीक्षा इ.३ री
- कब बुलबुल विभागातील राज्यस्तरीय हीरक पंख व चतुर्थ चरण परीक्षा तसेच राष्ट्रीय सुवर्णबाण परीक्षा इ .
शालेय उपक्रम
- संस्कृत व इंग्रजी संवाद कौशल्यवर्धनासाठी अभ्यासक्रम.
- आधुनिक संगणक शिक्षण व स्मार्ट क्लासरूम सुविधा.
- वाचनाची गोडी लावणारे वाचनालय आणि प्रयोगशील विज्ञान-गणित प्रयोगशाळा.
- आनंददायी शिक्षणासाठी संगीत व चित्रकला वर्ग.
- शालेय पोषण आहार, विद्यार्थी आरोग्य तपासणी व उपस्थिती प्रोत्साहन उपक्रम.
- पुणे दर्शन प्रकल्प व पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती.
- 'गीत रामायण' नृत्य नाट्य व विविध सांस्कृतिक सहशालेय उपक्रम.
खेळ व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम
- शरीर व मन दोन्ही तंदुरुस्त ठेवण्यासाठी शाळेच्या परिसरात उभारलेले ओपन जिम.
- कराटे, लंगडी व खोखो या खेळांचे तज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण.
- स्वयंशिस्त व राष्ट्रप्रेम रुजविणारे कब बुलबुल राष्ट्रीय पुरस्कार विजेते विद्यार्थी.
- विद्यार्थ्यांच्या ऊर्जेला दिशा देणारे शाळेचे वैशिष्ट्यपूर्ण बँड पथक.
- विविध आंतरशालेय व बाह्य स्पर्धांमध्ये सहभाग व यशस्वी कामगिरी.
- इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलेला तीन मिनिटांत सर्वाधिक पंचेस मारण्याचा कराटे विश्वविक्रम.