पुस्तक परीक्षण
Posted on April 30, 2025
सौ. वैशाली आजबे
शिक्षिकापुस्तकाचे नाव - 'इकिगाई' (दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य)
लेखक - हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस ( अनुवाद प्रसाद ढापरे ) पुस्तकाची किंमत - २८० रु., मायमिरर पब्लिशिंग हाऊस
इकिगाई ही एक जपानी संकल्पना आहे. याचा ढोबळ अर्थ आहे 'सतत व्यस्त राहण्यामध्ये असणारा आनंद.' इकिगाई हा शब्द लोकांच्या दिर्घकाळ जगण्याचं रहस्य सांगतो. 'इकिगाई' म्हणजेच नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी आपण जन्माला आलो आहोत हे शोधणे. या पुस्तकात आपल्याला इकिगाई जीवन कसे जगायचे आहे. तसेच शारीरिक स्वास्थ्यासाठी ८० टक्क्याचं रहस्य उत्साही शरीर, उत्साही मन, तणावाचा फायदा घेण्याची कला यामध्ये सांगितली आहे.
स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम, लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी, तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम स्पष्ट केला आहे. जपानी लोक असे मानतात की प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. लेखकाने या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या. दीर्घायुष्याच खरं रहस्य जाणलं. ते सर्व त्यांनी पुस्तकाद्वारे मांडले आहे. थोडक्यात इकिगाई हे पुस्तक जपानी पद्धतीने दीर्घ आणि निरोगी आयुष्य कसे जगायचे याचे रहस्य प्रकट करते. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपल्या 'इकिगाई' सापडण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे सर्वांनी हे पुस्तक जरुर वाचावे.