प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन

२७ फेब्रुवारी २०२५ : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा व साईनाथ मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारवाडा व लाल महाल येथेशाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी मराठी अभिमान व महाराष्ट्र गीत गायले. विद्यार्थी विविध संत,राष्ट्रपुरुष, समाज सुधारक, शिवाजी महाराज, झाशीची राणी, संत ज्ञानेश्वर, क्रांतिकारक तसेच थोर मराठी साहित्यिक यांच्या वेशभूषेत आले होते.
तसेच शाळेतही मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सरस्वतीपूजन व वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मा. मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाघ यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मातृभूमी व मातृभाषेचा अभिमान बाळगा. लेखन, वाचनाने स्वतःला समृद्ध करा असा संदेश दिला. इ.३री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनीकाही मराठी कवितांचे सादरीकरण केले. मीनल कचरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. योगिता भावकर यांनी मराठी भाषा गौरव दिनाची माहिती सांगितली. शाला समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्यामार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास धनंजय तळपे, प्रतिभा पाखरे,स्वाती यादवयांनी आयोजनास सहाय्य केले. 

कार्यक्रम

  • ग्रो बॅग तयार करणे

    ग्रो बॅग तयार करणे

    ७ ऑक्टोबर २०२६ :आपल्या नवीन मराठी शाळेत मुलां ... Read More

  • डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन,

    डेक्कन एज्युकेशन सोस ...

    ११ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ... Read More

  • लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांची केसरी वाडा येथे क्षेत्रभेट

    लोकमान्य टिळक जयंती ...

    २३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More

  • नवीन मराठी शाळेत  पालखी सोहळा - ज्ञानपंढरी विठ्ठल नामाने दुमदुमली

    नवीन मराठी शाळेत पा ...

    १८ जुलै २०२६ :  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More

  • नवीन मराठी शाळेत आषाढ महिन्यातील प्रथम दिवस महाकवी कालिदास दिन साजरा.

    नवीन मराठी शाळेत आषा ...

     १५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स