- Events /
- नवीन मराठी शाळेत पालखी सोहळा - ज्ञानपंढरी विठ्ठल नामाने दुमदुमली
नवीन मराठी शाळेत पालखी सोहळा - ज्ञानपंढरी विठ्ठल नामाने दुमदुमली
१८ जुलै २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.अतिशय नेत्रदीपक अशा या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी विठ्ठल,रुक्मिणी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत नामदेव,संत जनाबाई,संत मुक्ताबाई,संत एकनाथ,संत चोखामेळा,संत कान्होपात्रा,संत दामाजी,संत गोरा कुंभार अश्या विविध संतांच्या वेशभूषेत आले होते. वारकरी रूपात आलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात टाळ,मृदुंग,तुळशी वृंदावन,भगव्या पताका ,वीणा शोभत होत्या. संतांच्या आणि विठोबा रखुमाईच्या गजराने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावी वारकरी नृत्य सादर केले. यामध्ये रिंगण, फुगड्या, लोटांगण या सर्व पारंपारिक प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. रवी वाघ या विद्यार्थ्याने शंख वादन केले.
मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी संतांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि संतांचे कार्य लक्षात ठेवून त्यांचा उपदेश आचरणात आणा असे सांगितले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पालखी मधून स्वच्छतेचा संदेश दिला.
शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षिका अर्चना देव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व वारीची माहिती सांगितली. योगिता भावकर यांनी आभार मानले.ज्ञानपंढरीत रंगलेल्या या सोहळ्याला पालकांचीही उपस्थिती होती.शाळेतील सर्व शिक्षक पारंपरिक वेशभूषेत या सोहळयात सहभागी झाले होते. अशा प्रकारे उत्साह पूर्ण वातावरणात पालखी सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे,स्वप्ना वाबळे, गायत्री बेलसरे,शीतल जाधव यांनी कार्यक्रमास आयोजन सहाय्य केले.
कार्यक्रम
-
लोकमान्य टिळक जयंती ...
२३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More
-
नवीन मराठी शाळेत पा ...
१८ जुलै २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More
-
नवीन मराठी शाळेत आषा ...
१५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More
-
नवीन मराठी शाळा - क ...
आज महाराष्ट्र राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. ... Read More
-
नवीन मराठी शाळेत साम ...
२७ जून २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More