प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • नवीन मराठी शाळेत सामाजिक न्यायदिनानिमित्त कीर्तनातून शाहू महाराजांच्या विचारांचे प्रबोधन

नवीन मराठी शाळेत सामाजिक न्यायदिनानिमित्त कीर्तनातून शाहू महाराजांच्या विचारांचे प्रबोधन

नवीन मराठी शाळेत सामाजिक न्यायदिनानिमित्त कीर्तनातून शाहू महाराजांच्या विचारांचे प्रबोधन

२७ जून २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत राजर्षी शाहू महाराजांची जयंती अर्थात सामाजिक न्यायदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विना दप्तर शाळा आणि आनंददायी ज्ञानात्मक शनिवार उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक समता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी प्रास्ताविकात राजर्षी शाहू महाराज हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी त्यांच्या समता, शिक्षणप्रेम, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशकतेच्या विचारांचा आदर्श ठेवावा तसेच सर्वांशी सलोख्याने वागावे, असे आवाहन केले.

यावेळी इयत्ता दुसरीतील नील बेलवणकर हा विद्यार्थी राजर्षी शाहू महाराजांच्या वेशभूषेत आला होता. त्याने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, नियमित व्यायाम आणि शिक्षणाचे महत्त्व आपल्या मनोगतातून सांगितले. 

शाळेतील शिक्षिका अर्चना देव यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्यावर कीर्तन सादर केले. त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जीवनकार्य, सामाजिक न्यायासाठीचे योगदान आणि शिक्षण क्षेत्रातील कार्य ओघवत्या शैलीत उलगडून सांगितले. इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थी संपूर्ण कीर्तन तल्लीन होऊन ऐकत होते. कीर्तनाला इयत्ता चौथीतील कैवल्य पिंगळकर तसेच संगीत शिक्षिका वैशाली पाटील यांनी वाद्यसाथ केली.

यानंतर इयत्ता दुसरीतील शार्दुल बांदल याने राजर्षी शाहू महाराजांवरील पोवाडा केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया इंदुलकर यांनी केले, तर मीनल कचरे यांनी आभार मानले. शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे, योगिता भावकर, पुष्पा देशमाने आणि स्वप्ना वाबळे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहकार्य केले. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि निमंत्रित पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम

  • लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांची केसरी वाडा येथे क्षेत्रभेट

    लोकमान्य टिळक जयंती ...

    २३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More

  • नवीन मराठी शाळेत  पालखी सोहळा - ज्ञानपंढरी विठ्ठल नामाने दुमदुमली

    नवीन मराठी शाळेत पा ...

    १८ जुलै २०२६ :  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More

  • नवीन मराठी शाळेत आषाढ महिन्यातील प्रथम दिवस महाकवी कालिदास दिन साजरा.

    नवीन मराठी शाळेत आषा ...

     १५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More

  • नवीन मराठी शाळा -  कृषी दिन

    नवीन मराठी शाळा - क ...

    आज महाराष्ट्र राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. ... Read More

  • नवीन मराठी शाळेत सामाजिक न्यायदिनानिमित्त कीर्तनातून शाहू महाराजांच्या विचारांचे प्रबोधन

    नवीन मराठी शाळेत साम ...

    २७ जून २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स