- Events /
- पालखी सोहळा
पालखी सोहळा
५ जुलै २०२५: शाळेत नेत्रदीपक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.पालखी सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थी विठ्ठल,रुक्मिणी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत नामदेव,संत जनाबाई,संत मुक्ताबाई,संत चोखामेळा,संत कान्होपात्रा,संत दामाजी,संत गोरा कुंभार अश्या विविध संतांच्या वेशभूषेत आले होते.तसेच टाळ,मृदुंग,तुळशी वृंदावन,भगव्या पताका इत्यादी हातात धरून नटलेल्या बाल वारकऱ्यांनी व विठोबा रखुमाईच्या गजराने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. इ.३री च्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल व रखुमाई रखुमाई...या गाण्यावर खूपच सुंदर नृत्य सादर केले. इयत्ता २री गरुड वर्गातील आरुष लोहोकरे या विद्यार्थ्याने शंख वादन केले.
मा. मुख्याध्यापिका सौ. हेमा जाधव यांना वारकरी वेशातील विदयार्थ्याचा पालखी सोहळा पाहून प्रत्यक्ष पंढरीला आल्यासारखे वाटले.तसेच संतांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच त्यांनी सर्वांना आषाढी एकादशी व पालखी सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व माहिती मनिषा कदम यांनी सांगितली. सौ. भाग्यश्री हजारे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.ज्ञानपंढरीत रंगलेल्या या सोहळ्याला पालक प्रतिनिधींची ही उपस्थिती होती.शाळेतील सर्व शिक्षक पारंपरिक वेशभूषेत या सोहळयात सहभागी झाले होते. अशा प्रकारे उत्साह पूर्ण वातावरणात पालखी सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे, योगिता भावकर , प्रिया इंदुलकर ,स्वप्ना वाबळे, वीणा कुलकर्णी यांनी कार्यक्रमास आयोजन सहाय्य केले.
कार्यक्रम
-
ग्रो बॅग तयार करणे
७ ऑक्टोबर २०२६ :आपल्या नवीन मराठी शाळेत मुलां ... Read More
-
डेक्कन एज्युकेशन सोस ...
११ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ... Read More
-
लोकमान्य टिळक जयंती ...
२३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More
-
नवीन मराठी शाळेत पा ...
१८ जुलै २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More
-
नवीन मराठी शाळेत आषा ...
१५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More