- Events /
- राजर्षी शाहू महाराज जयंती
राजर्षी शाहू महाराज जयंती
२६ जुलै २०२५ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती अर्थात 'सामाजिक न्यायदिन' उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा समिती अध्यक्ष श्री. राजेंद्र जोग सर यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीपूजन, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.मुख्याध्यापिका सौ.कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना, शाहू महाराजां प्रमाणे शक्तीने व विद्येने श्रेष्ठ व्हा व त्याचा वापर समाजाच्या कल्याणासाठी करा' असा संदेश दिला. इयत्ता चौथी पुरंदर वर्गातील सर्वेश चिवटे हा शाहू महाराजांच्या वेशभूषेत आला होता."भरपूर शिका,रोज व्यायाम करा,आपल्या शिक्षणाचा उपयोग गोरगरीबांना मदत करण्यासाठी करा."असा संदेश त्याने आपल्या मनोगतातून दिला. ' गोरगरीब अन दीनदलितांचा केला उद्धार ' हा पोवाडा विद्यार्थ्यांनी सादर केला.
"लोकमत" पेपर तर्फे आयोजित "उत्तम वाचक" हा बक्षीस समारंभ यावेळी करण्यात आला. मनिषा कदम यांनी शाहू महाराज यांची माहिती सांगितली.भाग्यश्री हजारे यांनी आभार मानले. ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने,धनंजय तळपे, यांनी नियोजन सहाय्य केले.
कार्यक्रम
-
ग्रो बॅग तयार करणे
७ ऑक्टोबर २०२६ :आपल्या नवीन मराठी शाळेत मुलां ... Read More
-
डेक्कन एज्युकेशन सोस ...
११ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ... Read More
-
लोकमान्य टिळक जयंती ...
२३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More
-
नवीन मराठी शाळेत पा ...
१८ जुलै २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More
-
नवीन मराठी शाळेत आषा ...
१५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More