- Events /
- स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन
शुक्रवार दि.२० डिसेंबर २०२४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतील स्नेहसंमेलनात शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ. कल्पना वाघ बाई यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् हा वैशिष्ट्यपूर्ण असा आगळावेगळा व अंगावर शहारे आणणारा कार्यक्रम झाला. यावर्षी वंदे मातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण होणार आहेत त्या निमित्ताने शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वंदे मातरम्* हा कार्यक्रम सादर केला गेला . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी मा.श्री.आर.बी. चाफळकर (नामवंत बांधकाम व व्यावसायिक ) उपस्थित होते.तसेच शाला समिती सदस्य मा .धनंजय कुलकर्णी, राजश्री ठकार, संस्थेचे पदाधिकारी, माजी शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते.
या कार्यक्रमात ५७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पूर्वीचा काळ त्यानंतर इंग्रज आपल्या देशात कसे आले, त्यांचा जुलूम आणि देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले याचे नृत्य नाट्य रूपात सादरीकरण करण्यात आले. यामध्ये राणी लक्ष्मीबाई, मदन लाल धिंग्रा,सुखदेव,भगतसिंग , राजगुरू, बिरसा मुंडा ,पंडित नेहरू, लोकमान्य टिळक ,अशा अनेक क्रांतिकारकांच्या भूमिकेतून वंदे मातरम् हा कार्यक्रम सादर केला गेला.मा.वाघ बाई यांच्या कार्याचा शाहीर हेमंत राजे मावळे यांचा स्वरचित पोवाडा त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला. प्रमुख पाहुणे श्री. चाफळकर सर यांनी भारावून जाऊन कार्यक्रमाचे एकाच शब्दात वर्णन केले ते म्हणजे"Amazing".
मुलांना मार्गदर्शन करताना त्यांनी 'जे मी करणार ते उत्तम करणार , कुटुंब, समाज व देशाची सेवा करा,त्यांना विसरू नका'असा मोलाचा संदेश दिला. धनंजय कुलकर्णी सर यांनी सर्व शिक्षकांना उपक्रमशील शिक्षक म्हणून शाब्बासकी दिली व कार्यक्रमातील विविधतेबद्दल कौतुक केले व शाळेमध्ये फक्त शैक्षणिक नव्हे तर मानसिक विकास याचा देखील विचार केला जातो हे सांगितले. तसेच कल्पना विलास नव्हे तर प्रत्यक्ष कल्पना उतरवणारी स्री असे मा. मुख्याध्यापिका सौ वाघ बाई यांच्या बद्दल सांगितले. व त्यांच्या कार्याचे खूप खूप कौतुक केले. यावेळी सौ.वैशाली जाधव ,सौ. पुष्पा देशमाने, सौ.कविता रायकर, श्री.सागर निंबाळकर यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ग्राफिक्स करणाऱ्या शिक्षिका सोनाली मुंढे, स्नेहल आपटे, योगिनी पोटभरे व बक्षीस विभागातील शिक्षिका भाग्यश्री हजारे,स्वप्ना वाबळे शितल नाखरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ.इंदुलकर यांनी करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मिनल कचरे यांनी केले.
कार्यक्रम
-
ग्रो बॅग तयार करणे
७ ऑक्टोबर २०२६ :आपल्या नवीन मराठी शाळेत मुलां ... Read More
-
डेक्कन एज्युकेशन सोस ...
११ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ... Read More
-
लोकमान्य टिळक जयंती ...
२३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More
-
नवीन मराठी शाळेत पा ...
१८ जुलै २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More
-
नवीन मराठी शाळेत आषा ...
१५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More