- Events /
- सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
मंगळवार दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत शतकोत्तरौप्य महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी श्री.मिलिंद माधवराव देशमुख त्यांचे वडील कै.माधवराव अण्णाजी देशमुख यांचे स्मरणार्थ ग्रीन एनर्जी संस्टेनेबल एल. एल. पी.या कंपनीच्या माध्यमातून 16kw क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन व हस्तांतरण श्री.मिलिंद देशमुख(माजी विद्यार्थी१९७५) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे शाळेसंदर्भातील विजेची गरज भागणार आहे. मिलिंद देशमुख यांनी आपल्या मनोगतातून शालेय प्रेमळ आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या आईच्या स्मरणार्थ रामरक्षा,अथर्वशीर्ष व मनाचे श्लोक पाठांतर यात इ. १ ली ते ४ थी तील उत्तम विद्यार्थ्यांना यासाठी बक्षीस ठेवले. यावेळी या प्रकल्पास सहाय्य करणारे श्रीकांत जोशी, समीर गांधी व ईशान गांधी यांचाही सत्कार करण्यात आला.
नियामक मंडळ व परिषदेचे माजी अध्यक्ष शरद कुंटे,वित्त नियंत्रक धनंजय कुलकर्णी हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.शाळासमिती अध्यक्ष श्री.राजेंद्र जोग यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले. प्रिया इंदुलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख करून दिली तसेच प्रकल्पाबद्दल माहिती सांगितली. योगिता भावकर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
कार्यक्रम
-
ग्रो बॅग तयार करणे
७ ऑक्टोबर २०२६ :आपल्या नवीन मराठी शाळेत मुलां ... Read More
-
डेक्कन एज्युकेशन सोस ...
११ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ... Read More
-
लोकमान्य टिळक जयंती ...
२३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More
-
नवीन मराठी शाळेत पा ...
१८ जुलै २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More
-
नवीन मराठी शाळेत आषा ...
१५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More