प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • शिक्षक दिनाच्या निमित्ताने पालक संघातर्फे शिक्षकांचा सत्कार

शिक्षक दिनाच्या निमित्ताने पालक संघातर्फे शिक्षकांचा सत्कार

शिक्षक दिनाच्या निमित्ताने पालक संघातर्फे शिक्षकांचा सत्कार

 ८ सप्टेंबर २०२५ : सुप्रसिद्ध रेडिओ आरजे शो शो शोनाली यांच्या हस्ते नवीन मराठी शाळेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने पालक संघातर्फे शिक्षकांचा सत्कार नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत पालक संघाच्या वतीने सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध रेडिओ आरजे शो शो शोनाली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव, ज्येष्ठ शिक्षिका योगिता भावकर, वंदना कदम,पालक संघाचे अध्यक्ष प्रणव जोशी, तेजश्री बाभूळगावकर पालक संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. आर जे शोनाली यांनी इयत्ता तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांची मनमोकळा संवाद साधत बोधकथा व पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. तसेच शाळेतील सर्व उपक्रमांचे कौतुक केले. इतकी महान परंपरा लाभलेल्या शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार करणे हे माझे भाग्य असे त्या यावेळी म्हणाल्या.

इयत्ता चौथी शिवनेरी वर्गातील रणंजय देसाई हा विद्यार्थी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वेशभूषेत आला होता. "एक शिक्षक चांगला माणूस घडवू शकतो. आणि चांगला समाज निर्माण करू शकतो." असे त्याने आपल्या मनोगतातून सांगितले. डॉक्टर सोनाली घाटणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भाग्यश्री पाटील यांनी अतिथी परिचय करून दिला. वर्षा मराठे कुलकर्णी यांनी आभार मानले. ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे, भाग्यश्री हजारे यांच्या सहकार्याने पालक संघाने अतिशय उत्तम प्रकारे हा कार्यक्रम सादर केला. इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी पहिली ते तिसरीच्या वर्गांवर अध्यापन केले.

कार्यक्रम

  • ग्रो बॅग तयार करणे

    ग्रो बॅग तयार करणे

    ७ ऑक्टोबर २०२६ :आपल्या नवीन मराठी शाळेत मुलां ... Read More

  • डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन,

    डेक्कन एज्युकेशन सोस ...

    ११ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ... Read More

  • लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांची केसरी वाडा येथे क्षेत्रभेट

    लोकमान्य टिळक जयंती ...

    २३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More

  • नवीन मराठी शाळेत  पालखी सोहळा - ज्ञानपंढरी विठ्ठल नामाने दुमदुमली

    नवीन मराठी शाळेत पा ...

    १८ जुलै २०२६ :  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More

  • नवीन मराठी शाळेत आषाढ महिन्यातील प्रथम दिवस महाकवी कालिदास दिन साजरा.

    नवीन मराठी शाळेत आषा ...

     १५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स