प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • शाळेचा १२६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

शाळेचा १२६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

शाळेचा १२६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

दिनांक ४ जानेवरी २०२५ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेचा १२६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सनई चौघड्याच्या मंगल वादनाने वातावरण मंगलमय झाले. गणेश सोनवणे आणि चंद्रशेखर आढाव यांनी हे वादन केले.मा.श्री.प्रमोद बाकरे हे शाळेचे माजी विद्यार्थी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन ,दीपप्रज्वलन व संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन व शालेय पाटीचे औक्षण करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना अभ्यास करून, संस्थापकांचा वारसा जपून देशाचे आदर्श नागरिक होण्याचा तसेच शाळेप्रती कृतज्ञ राहण्याचा संदेश दिला.इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, विष्णुशास्त्री चिपळूणकर,वामन शिवराम आपटे व राजर्षी शाहू महाराज यांच्या वेशभूषेत मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रमोद बाकरे यांनी मुलांशी संवाद साधताना " त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच भरपूर श्रम करून स्वप्नपूर्ती करा आणि ते करत असताना समाजालाही आपल्याबरोबर घेऊन चला." असे सांगितले. 

"एक मुखाने नमशाचा या करूया जयजयकार" या शालागीताने शाळेचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.शाला समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.प्रतिभा पाखरे यांनी सूत्रसंचालन केले. योगिता भावकर यांनी शाळेची माहिती सांगितली व आभार मानले. मीनल कचरे यांनी शाळेची आरोळी घेतली. स्वाती यादव यांनी अतिथी परिचय करून दिला. ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने व धनंजय तळपे यांनी आयोजनास सहाय्य केले आकाशात फुगे सोडून नवीन मराठी शाळेचे नाव संपूर्ण जगभरातच नव्हे तर संपूर्ण आसमंतात दुमदुमले. विद्यार्थ्यांना केकचा खाऊ देण्यात आला. 

कार्यक्रम

  • ग्रो बॅग तयार करणे

    ग्रो बॅग तयार करणे

    ७ ऑक्टोबर २०२६ :आपल्या नवीन मराठी शाळेत मुलां ... Read More

  • डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन,

    डेक्कन एज्युकेशन सोस ...

    ११ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ... Read More

  • लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांची केसरी वाडा येथे क्षेत्रभेट

    लोकमान्य टिळक जयंती ...

    २३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More

  • नवीन मराठी शाळेत  पालखी सोहळा - ज्ञानपंढरी विठ्ठल नामाने दुमदुमली

    नवीन मराठी शाळेत पा ...

    १८ जुलै २०२६ :  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More

  • नवीन मराठी शाळेत आषाढ महिन्यातील प्रथम दिवस महाकवी कालिदास दिन साजरा.

    नवीन मराठी शाळेत आषा ...

     १५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स