प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • ७९वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

७९वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

७९वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

१५ ऑगस्ट २०२५: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत ७९वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन मराठी शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग सर, NEMS स्कूल इयत्ता दहावी सन २०२४-२५प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी सक्षम वाईकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

कार्यक्रमासाठी नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव, एन.ई.एम. एस. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रितम जोशी, एन.ई. एम. एस. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख, एन. ई. एम. एस. पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी, रानडे बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका अमिता दाते उपस्थित होते. 

प्रमुख अतिथी शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग सर यांनी आपल्या भाषणातून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन, मोबाईल संस्कृतीला बाजूला ठेवून खेळण्याला महत्व द्या असे मुलांना व पालकांना सांगितले. मायभूमीच्या वाऱ्यासंगे...हे समूहगीत व राज्यगीत सर्व विद्यार्थ्यांनी सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर सामुदायिक कवायत अतिशय उत्तम प्रकारे सादर केली. इयत्ता चौथी शिवनेरी वर्गातील अद्विका पवार या विद्यार्थिनीने कवायत प्रकाराचे नेतृत्व केले.शिक्षिका वंदना कदम यांनी स्वातंत्र्य दिनाची माहिती, क्रांतिकारक भगवती चरण वोहरा आणि त्यांच्या पत्नी दुर्गा बोहरा यांच्या त्याग व बलिदानाची गोष्ट सांगितली. 

शिक्षिका अर्चना देव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. इ.४थी शिवनेरी वर्गातील पृथा कुलकर्णी ही विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी भारत मातेच्या वेशभूषेत आली होती. 

संपूर्ण वंदे मातरम् सामुदायिक गायनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. ध्वजारोहणासाठी उपस्थित सर्व नागरिक पालकवृंद या कार्यक्रमाचे कौतुक केले. 

 शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व १२३९विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत हर घर तिरंगा या अभियानात सहभाग घेतला. ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे, योगिता भावकर, अश्विनी राजवाडे, सुषमा घडशी, प्रकाश राऊत यांनी आयोजन सहाय्य केले.

कार्यक्रम

  • ग्रो बॅग तयार करणे

    ग्रो बॅग तयार करणे

    ७ ऑक्टोबर २०२६ :आपल्या नवीन मराठी शाळेत मुलां ... Read More

  • डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन,

    डेक्कन एज्युकेशन सोस ...

    ११ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ... Read More

  • लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांची केसरी वाडा येथे क्षेत्रभेट

    लोकमान्य टिळक जयंती ...

    २३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More

  • नवीन मराठी शाळेत  पालखी सोहळा - ज्ञानपंढरी विठ्ठल नामाने दुमदुमली

    नवीन मराठी शाळेत पा ...

    १८ जुलै २०२६ :  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More

  • नवीन मराठी शाळेत आषाढ महिन्यातील प्रथम दिवस महाकवी कालिदास दिन साजरा.

    नवीन मराठी शाळेत आषा ...

     १५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स