- Events /
- वाचन प्रेरणा दिन
वाचन प्रेरणा दिन
१५ ऑक्टोबर २०२५ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस अर्थात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रस्वतीपूजन,दीपप्रज्वलन व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून," वाचनाने स्वतःला समृद्ध करा, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत देश घडवण्यासाठी स्वतःला सिद्ध करा." असे सांगितले.
नवीन मराठी शाळेत मुलांचे वाचन पक्के व्हावे म्हणून डोअरस्टेपशी संलग्न वाचन सराव उपक्रम राबवला जातो.डोअरस्टेपच्या मुलांना वाचन शिकवण्यासाठी येणाऱ्या ताई ज्यांना लहान मुलांना मदत करणाऱ्या 'वाचनपरी' हे नाव देण्यात आले आहे, त्या सर्व वाचनपऱ्यांचा सत्कार वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने करण्यात आला. वाचनालय विभागाच्या शिक्षिका प्रतिभा जाधव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
भावे स्कूल आयोजित आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संघाने यावेळी नाट्य वाचन सादर केले. शिक्षिका रूपाली सावंत यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती सांगितली. मनीषा कदम यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. स्वाती यादव यांनी सूत्रसंचालन केले. योगिता भावकर यांनी आभार मानले. पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात, मैदानावर ,बागेत, वाचनालयात, व्हरांड्यामध्ये बसून विविध पुस्तकांचे वाचन केले. ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे भाग्यश्री हजारे यांनी नियोजन सहाय्य केले.
कार्यक्रम
-
लोकमान्य टिळक जयंती ...
२३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More
-
नवीन मराठी शाळेत पा ...
१८ जुलै २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More
-
नवीन मराठी शाळेत आषा ...
१५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More
-
नवीन मराठी शाळा - क ...
आज महाराष्ट्र राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. ... Read More
-
नवीन मराठी शाळेत साम ...
२७ जून २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More