- Events /
- विज्ञान प्रदर्शनी प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा
विज्ञान प्रदर्शनी प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा
सोमवार दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नाविन्यपूर्ण अशा विज्ञान प्रदर्शनी प्रयोगशाळेचे व व्हर्च्युअल रियालिटी चा उपयोग करून शाळेचे थ्रीडी तंत्रज्ञानाने शाळेचे केलेले चित्रण याचे उद्घाटन अतिशय उत्साहात करण्यात आले.
शाला समिती अध्यक्ष श्री राजेंद्र जोग सर व मुख्याध्यापिका कल्पना वाघ बाई यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विद्यार्थिनी डॉ. लीना देशपांडे विभाग प्रमुख सी.एस.आर. विभाग,भारत फोर्ज लिमिटेड यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर माजी विद्यार्थिनी श्रीम.अनुपमा दुनाखे- पाटील ,श्री शेखर खाकुर्डीकर,श्री.प्रमोद नऱ्हे,गुजबम्स कंपनी , डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी , श्री.प्रमोद नऱ्हे ,श्री.प्रदीप आसावा,श्री.जयदीप लाड,प्रा.सौरभ मराठे ,श्री.राहुल दडगे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनी दालनात सैनिकांची शास्त्रास्त्रे व युद्ध साहित्य, शिवरायांची शिवाई व शिवराई यांसारखी नाणी , खगोलशास्त्रीय दालनात ग्रह व तारे यांच्या प्रतिकृती तसेच अंतराळ संशोधक, खरेखुरे चिलखत, मोठी तापमापी, वैज्ञानिक उपकरणे दालन, मानवी शरीरातील अंतरेंद्रिये, ज्ञानेंन्द्रिये, प्राणी पक्ष्यांच्या प्रतिकृती व प्रत्यक्ष नमुने, सजीव सृष्टी , पदार्थ विज्ञानातील,रंगचक्र,प्रिझम ,बायोगॅस यांसारखे मॉडेल येथे पहावयास मिळतील. *'करी विज्ञान दूर अज्ञान'* या उक्तीनुसार विद्यार्थ्यांना भारताचे भावी नागरिक होण्यास ही प्रयोगशाळा निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. श्री. सौरभ मराठे सर व त्यांच्या टीमने व्हर्चुअल रियालिटी चा उपयोग करून थ्रीडी तंत्रज्ञानाने संपूर्ण शाळेचे चित्रण केलेले आहे त्यामुळे शाळा जगभरात कोठेही असलो तरी दिसू शकते. हे टीव्हीवर प्रथम सर्वांना दाखवण्यात आले.स्वागत व प्रास्ताविकानंतर विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत सादर केले. शास्त्रज्ञ बनून आलेल्या शास्त्रज्ञांचे स्वगत झाले. प्रिया इंदुलकर बाई यांनी प्रकल्पाची माहिती सांगितली. *'विज्ञान वर्गात अभ्यास करून स्फूर्ती घेऊन तुम्ही भविष्यात चांगले संशोधक बना'* असा मोलाचा संदेश प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून दिला. तसेच विज्ञान प्रकल्प,विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.वैशाली जाधव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रिया इंदुलकर यांनी सूत्रसंचालन केले. आभाराचे गोड काम योगिता भावकर यांनी केले. विज्ञान विभाग व सर्व शिक्षक यांनी नियोजन सहाय्य केले.
कार्यक्रम
-
ग्रो बॅग तयार करणे
७ ऑक्टोबर २०२६ :आपल्या नवीन मराठी शाळेत मुलां ... Read More
-
डेक्कन एज्युकेशन सोस ...
११ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ... Read More
-
लोकमान्य टिळक जयंती ...
२३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More
-
नवीन मराठी शाळेत पा ...
१८ जुलै २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More
-
नवीन मराठी शाळेत आषा ...
१५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More